बस्स झालं, नवी जबाबदारी द्या, अजित पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत

“बस्स झालं, नवी जबाबदारी द्या”, अजित पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत”

| Updated on: Jun 22, 2023 | 1:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक इच्छा बोलून दाखवली. मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. सर्व आमदारांनी सह्या केल्या आणिन त्यांच्या आग्रहाखातर मी विरोधी पक्षनेता झालो. एक वर्ष हे पद सांभाळतोय.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक इच्छा बोलून दाखवली. मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. सर्व आमदारांनी सह्या केल्या आणिन त्यांच्या आग्रहाखातर मी विरोधी पक्षनेता झालो. एक वर्ष हे पद सांभाळतोय. पण आता मला या पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा आणि मला पक्ष संघटनेची जबाबदारी द्या. त्या पदाला न्याय द्यायचं काम करेन, असं अजित पवार म्हणाले. त्यावर आता राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला मनापासून आनंद आहे की दादालाही संघटनेत काम करायची ईच्छा आहे. यामुळे कार्यकर्ता केडरमधे उत्साह संचारला आहे. दादा ने ही इच्छा व्यक्त केली ही आनंदाची गोष्ट आहे. दादांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचं की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे. अजितदादांची ईच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा आहे

Published on: Jun 22, 2023 01:40 PM