'हे' बाळासाहेबांना कधीच पटलं नसतं; सुप्रिया सुळे यांनी खंत बोलून दाखवली...

‘हे’ बाळासाहेबांना कधीच पटलं नसतं; सुप्रिया सुळे यांनी खंत बोलून दाखवली…

| Updated on: Jan 23, 2023 | 11:22 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही ठाकरे-पवार कुटुंबाचे संबंधांवर भाष्य केलंय. पाहा...

पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ठाकरे-पवार कुटुंबाचे संबंधांवर भाष्य केलंय. “बाळासाहेब ठाकरे आणि पवार कुटुंबियांचे पाच दशकांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई यांच्याशी आमचे खूप चांगले संबध होते. दुर्दैव आहे आज जी रस्सीखेच सुरू आहे ती बाळासाहेबांना कधीही पटली नसती. त्यांना हे सगळं कदापिही पटलं नसतं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Published on: Jan 23, 2023 11:22 AM