केसरकरांच्या 'त्या' ऑफरवर सुप्रिया सुळे म्हणता, अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन!

केसरकरांच्या ‘त्या’ ऑफरवर सुप्रिया सुळे म्हणता, “अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन!”

| Updated on: Jun 16, 2023 | 3:18 PM

Supriya Sule, NCP, Ajit Pawar, Shinde-Fadnavis Government, Deepak kesarkar, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शिंदे-फडणवीस सरकार, दीपक केसरकर

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे. दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे, अशी थेट खुली ऑफर दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना दिल्याने चर्चेला उधाण आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि नवनिर्वाचित कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित दादाचं सर्वच‌ स्वागत करतात. अमिताभ बच्चन सगळ्यांना हवा असतो. दादा महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन आहेत. सगळ्यांना हवे असतील तर त्यात काय एवढं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Published on: Jun 16, 2023 03:18 PM