Video : कुणाच्या वडिलांनी मरावं अशी पोस्ट कोणत्या संस्कृतीत बसते?, सुप्रिया सुळेंचा केतकी चितळेला सवाल
राज्यात हिंदूत्व हनुमान, चालीसा, नवनीत राणा (Navneet Rana), रवी राणा यांची अटक अशी प्रकरण गाजत असताना आता नव्या वादाला तोंड फुडलंय. कारण अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने तिच्या पोस्टमध्ये पवारांबद्दल (Sharad Pawar) वादग्रस्त मजकूर टाकला. त्यानंतर शनिवारी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल व्हायची मालिका सुरू झाली. आणि बघता बघता केतली चितळेला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. आज […]
राज्यात हिंदूत्व हनुमान, चालीसा, नवनीत राणा (Navneet Rana), रवी राणा यांची अटक अशी प्रकरण गाजत असताना आता नव्या वादाला तोंड फुडलंय. कारण अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने तिच्या पोस्टमध्ये पवारांबद्दल (Sharad Pawar) वादग्रस्त मजकूर टाकला. त्यानंतर शनिवारी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल व्हायची मालिका सुरू झाली. आणि बघता बघता केतली चितळेला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. आज तिला ठाणे कोर्टात हजर केलं त्यानंतर कोर्टानं तिला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र यावर अजूनही राष्ट्रवादीकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून केतकी चितळेला फटकारलं आहे. कुणाच्या वडिलांनी मरावं अशी पोस्ट कोणत्या संस्कृतीत बसते? असा सवाल त्यांनी केतकी चितळेला केला आहे.
Published on: May 15, 2022 04:07 PM
Latest Videos