आरोप करायचे आणि पळून जायचं, ही भारताची संस्कृती नाही; सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्यांना सुनावलं...

आरोप करायचे आणि पळून जायचं, ही भारताची संस्कृती नाही; सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्यांना सुनावलं…

| Updated on: Mar 11, 2023 | 1:50 PM

Supriya Sule on Kirit Somaiya : ईडी आणि सीबीआयची रेड होणार आहे, हे आधी कसं कळतं? हे आधी कळत असेल तर या राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे .त्यावर अमित शाह यांनी कमिटी नेमली पाहिजे. देशाला उत्तर दिले पाहिजे की या लिकेजेस कशा होतात ते..., असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

माळेगाव, बारामती : राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत यांच्या केसची ऑर्डर बघा. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीचा आरोप केला आणि आता 1 कोटीचा आरोप करत आहे.. मग 99 कोटींचं काय झालं? आरोप करायचा आणि पळून जायचे ही भारतीय संस्कृती नाही.भाजप सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना भीती घालत आहेत. पण आम्ही घाबरणारे नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Published on: Mar 11, 2023 01:50 PM