संजय राऊत यांना धमकी येणं हे गृहमंत्रालयाचं अपयश; देवेंद्रजी, झेपत नसेल तर राजीनामा द्या

“संजय राऊत यांना धमकी येणं हे गृहमंत्रालयाचं अपयश; देवेंद्रजी, झेपत नसेल तर राजीनामा द्या”

| Updated on: Apr 01, 2023 | 11:28 AM

Supriya Sule on Sanjay Raut Death Threats : खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्यात? पाहा...

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संजय राऊत यांना ही धमकी देण्यात आली आहे. सिद्धू मुसेवालाप्रमाणे AK 47 ने मारू, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशी हिंमत या राज्यात करू पाहतंय याचा अर्थ हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे वाचाळवीरांचं सरकार आहे. त्यामुळे मंत्री आणि आमदार काही म्हटले तरी मला आश्चर्य वाटत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Published on: Apr 01, 2023 11:26 AM