सामनातील अग्रलेखावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या,ही दडपशाही...

सामनातील अग्रलेखावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या,”ही दडपशाही…”

| Updated on: Jun 12, 2023 | 3:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि नेते प्रफुल्ल पटेल यांची निवड केली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सामनाच्या अग्रलेखात देखील शरद पवारांच्या या निर्णयावर भाष्य करण्यात आलं आहे.यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि नेते प्रफुल्ल पटेल यांची निवड केली आहे. मात्र यावेळी अजित पवारांवर कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सामनाच्या अग्रलेखात देखील शरद पवारांच्या या निर्णयावर भाष्य करण्यात आलं आहे. “शरद पवारांनी भाकरी फिरवली नसून आता कोठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल”, असे सामनातून म्हटले आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ही दडपशाही नाही लोकशाही आहे. त्यामुळे सामनातील अग्रलेखात जे लिहिलं त्यात गैर काय? त्यांना बोलण्याचा अधिकार आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Published on: Jun 12, 2023 03:45 PM