Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना आठवण करुन दिली संस्कृतीची, टीकेला उत्तरही

Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना आठवण करुन दिली संस्कृतीची, टीकेला उत्तरही

| Updated on: Sep 13, 2022 | 9:04 PM

सुप्रिया सुळे यांनी शिंदेना आपल्या संस्कृतीची आठवण करुन दिली आहे. रात्री सर्व कामे उरकून रात्री सातच्या आत घरात ही आमची संस्कृती होती. शिवाय अजित पवारही याच संस्कृतीमध्ये वाढले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुणे :  (CM Ekanth Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणच्या सभेत (Supriya Sule) खा. सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका केली होती. शिवाय अजित पवार हे सकाळी 6 वाजता कामाला सुरवात करतात तर आपण सकाळी 6 पर्यंत अविरत काम करीत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. शिवाय ज्या ठिकाणी कॅमेरे घेऊन जाता येतात तिथेच आमची कामेही होतात असा टोलाही लगावला आहे. याला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी शिंदेना आपल्या (Cultural) संस्कृतीची आठवण करुन दिली आहे. रात्री सर्व कामे उरकून रात्री सातच्या आत घरात ही आमची संस्कृती होती. शिवाय अजित पवारही याच संस्कृतीमध्ये वाढले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Published on: Sep 13, 2022 09:04 PM