दादा सीनियर सिटीजन नाऊ, सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना काय लगावला टोला?

| Updated on: Jan 07, 2024 | 2:48 PM

अजित पवार मित्रमंडळ भाजपच्या चिन्हावर लढणार असे वक्तव्य करत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. तर अजित पवार यांनी या टीकेवर बोलताना रोहित अजून बच्चा आहे, असं म्हटलं होतं. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा वयाने मोठा आहे. तो रोहितचा काका आहे. थोडा काही बोलला तर...

पुणे, ७ जानेवारी २०२४ : रोहित पवार यांच्याकडून अजित पवार मित्रमंडळ असा उल्लेख करण्यात आला तर अजित पवार मित्रमंडळ भाजपच्या चिन्हावर लढणार असे वक्तव्य करत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. तर अजित पवार यांनी या टीकेवर बोलताना रोहित अजून बच्चा आहे, असं म्हटलं होतं. तर रोहित पवारला माझे कार्यकर्ते उत्तर देतील, रोहित पवार याला उत्तर द्यायला तो इतका मोठा झालेला नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा वयाने मोठा आहे. तो रोहितचा काका आहे. थोडा काही बोलला तर आपण एवढं कशाला मनाला लावून घ्यायचं? रोहितचं वय 40 तर दादा 65 वर्षाचा आहे. त्यामुळे काकांनी काही बोललं तर इट्स ओके. दादा सीनियर सिटीजन नाऊ, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आणि टोलाही लगावला.

Published on: Jan 07, 2024 02:48 PM
रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, अयोध्येतील राम मंदिरात आता रामायण पाहता येणार, पण कसं?
… ही राजकीय भूकंपाची सुरूवात, संजय राऊत यांनी काय केलं आमदार अपात्रतेच्या निकालावर सूचक वक्तव्य?