सुप्रिया सुळे यांचा ‘तो’ दावा, अमोल मिटकरी यांनी लगावला टोला
लोकसभेत केलेल्या भाषणावरून अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय. याचवेळी त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांच्यावरही टीका केलीय.
वाशीम : 4 ऑक्टोबर 2023 | खूप कमी भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी असतात असे सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या होत्या. त्यांच्या या भाषणाशी मी सहमत आहे. अजित दादा तन मन धनाने काम करतात म्हणून सुप्रिया ताई मागील अनेक वर्षापासून बारामतीतून निवडून येत आहेत असा दावा आ. अमोल मिटकरी यांनी केला. वाशिममध्ये आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्या ते बोलत होते. आम्ही पुरोगामीपणा सोडला नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि इतर आमदार शरद पवार यांना सोडून भाजपसोबत गेल्याने पुरोगामीपणा सोडल्याची टीका केली जाते. मात्र, आम्ही भाजपसोबत गेलो पण आम्ही पुरोगामीपणा सोडला नाही असे ते म्हणाले.
Published on: Oct 04, 2023 11:55 PM
Latest Videos