स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेळ का लागतोय? सुप्रिया सुळे म्हणतात खोके सरकारला ‘ही’ भीती
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब होत आहे. यावरून राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब होत आहे. यावरून राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे, फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी जनतेला वेठीस धरणे बरोबर नाही. सध्या महापालिका निवडणुकांचा कार्यकाळ संपल्याने महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकांची कामं खोळंबली आहेत. नागरसेवक हा स्थानिक प्रतिनिधी असतो, तो लोकांच्या अडचणी सोडवण्याचे काम करतो, मात्र निवडणुका लांबल्याने सर्वत्र गोंधळ उडाला आहे. प्रसार माध्यमांनी निवडणुकीबाबत सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. हा सर्व्हे खोके सरकारच्या विरोधात जाणारा असल्यामुळेच कदाचीत निवडणुका घेण्याची त्यांना भीती वाटत असावी असा टोला सुप्रीया सुळेंनी लगावला आहे.
Published on: Sep 18, 2022 12:27 PM
Latest Videos