मंत्र्यांना विलंब, भाजपचे आमदाराचा घरचा आहेर; म्हणाला, आम्ही काय पागल बिगल आहोत काय?

मंत्र्यांना विलंब, भाजपचे आमदाराचा घरचा आहेर; म्हणाला, “आम्ही काय पागल बिगल आहोत काय?”

| Updated on: Jul 26, 2023 | 9:36 AM

राज्याच्या विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाले तरी अधिकारी आणि सरकारमधील संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. यावरून भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई,26 जुलै 2023 | राज्याच्या विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाले तरी अधिकारी आणि सरकारमधील संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. यावरून भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना सभागृहात कृषी मंत्री किंवा संबंधित जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने सुरेश धस यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. “आमच्याकडे गाडी जरी नसली तरी आम्ही टॅक्सी करून इथपर्यंत वेळेवर येतो. आम्ही तीन-तीन जिल्ह्यातून निवडून येतो. विधानसभेतूनही काही माणसं इथे निवडून येतात. आम्ही काय पागल-बिगल आहोत का? इथं येऊन बसायला. इथे मंत्री नाहीत, अधिकारी नाहीत, ते दहा मिनिटांनी उशिरा आले. त्यांना समज दिली पाहिजे. हा आमचा हक्क आहे. हे सर्वोच्च सभागृह आहे. सभागृहात आम्ही गोट्या खेळायला येतो का? येथे कृषी विभागाचा कोणता जबाबदार अधिकारी आला आहे, ते मला सांगा. आम्ही आत्महत्येसारख्या महत्त्वाच्या विषयावर बोलत आहोत,” असं सुरेश धस म्हणाले.

 

Published on: Jul 26, 2023 09:36 AM