Suresh Dhas News : सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
Suresh Dhas Visits Satish Bhosale Family : सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याचं घर अज्ञात इसमांनी जाळलं आहे. त्यानंतर आज सुरेश धस यांनी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली.
आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे आरोपी खोक्या भोसले याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले आहेत. वन विभागाने खोक्याच्या घरावर तोडक कारवाई केली होती. त्यानंतर त्याच रात्री अज्ञात इसमांनी त्याच घर जाळून टाकलं. यामुळे खोक्याच्या घरच्यांनी संताप व्यक्त करत न्याय मागितला होता. त्यानंतर आज आमदार सुरेश धस हे शिरूर कासार गावात आम सभेसाठी आले असता त्यांनी खोक्या भोसले याच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. यावेळी सतीश भोसले याच्या परिवाराने त्यांना आपबिती सांगितली.
Published on: Mar 16, 2025 06:01 PM
Latest Videos

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
