“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे”, ओडिशा दुर्घटनेवर सुषमा अंधारे यांची भूमिका
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण हादरला. बालासोर जिल्ह्यातील बहानागा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला. या भीषण अपघातात 280 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित घटनास्थळाची पाहणी केली आणि या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पुणे : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण हादरला. बालासोर जिल्ह्यातील बहानागा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला. या भीषण अपघातात 280 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित घटनास्थळाची पाहणी केली आणि या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कालच्या रेल्वे अपघातानंतरनंतर काही व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडीओमध्ये मृतदेहांना टेम्पोमध्ये भरून घेऊन जाताना दिसत आहे. स्वत:ला विश्वगुरू म्हणून घेणारे आणि त्यांचे भक्त त्यांची आरती ओवाळत असतात. ते अँब्युलन्स देत नसतील तर ते कसले विश्वगुरू?” असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. “तसेच मृतांचा आकडा हा 700 पर्यंत जावू शकतो, सिग्नल वेळेवर दिला नाही म्हणून अपघात झाला. यावर पंतप्रधान यांनी ठोस भूमिका घ्यायला हवी होती. 10 लाख रुपये माणसाच्या जीवनाची किंमत असू शकत नाही, हे मोदी यांनी लक्षात घ्यावे. नैतिकता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे होता”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.