एकनाथ शिंदे बाळासाहेबांची कॉपी करून दसरा मेळावा हायजॅक करू पाहताहेत

“एकनाथ शिंदे बाळासाहेबांची कॉपी करून दसरा मेळावा हायजॅक करू पाहताहेत”

| Updated on: Sep 30, 2022 | 10:38 AM

दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अश्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दसरा मेळाव्याच्या टीजरवरून टीका केली आहे.

अभिजीत पोते, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अश्यात शिंदेगट आणि शिवसेनेचे नेते विरोधी गटावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर दसरा मेळाव्याच्या टीजरवरून टीका केली आहे. “एकनाथ शिंदे हुबेहूब बाळासाहेबांची कॉपी करून दसरा मेळावा हायजॅक करू पाहत आहेत”, असं सुषमा अंधारे (Sushama Andhare) म्हणाल्या आहेत.

Published on: Sep 30, 2022 10:38 AM