सुशीलकुमार शिंदे हिंदूंना भगवे दहशतवादी म्हटले होते, राम सातपुते यांची टीका
सोलापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. सोलापूरकरांना मुंबई आणि पुण्यात जाण्याची वेळ येणार नाही अशी कामे करणार असल्याचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी म्हटले आहे.
सोलापूर : सुशीलकुमार यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत सोलापूर जिल्ह्याचा नेमका काय विकास केला याचा हिशेब द्यावा आम्ही नरेंद्र मोदी दहा वर्षांत केलेली कामे सांगू असे आवाहन भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी केले आहे. सोलापूर लोकसभेच्या कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडीलांना का मध्ये आणता थेट माझ्यावर बोला ना अशी टीका सातपुते यांच्यावर केली आहे. यावर बोलताना आपण सामान्य घरातून आलेलो आहोत. आपण प्रणिती शिंदे यांच्यासारख्या मोठ्या घरातून आलेलो नाही. आम्ही विकासावरच बोलणार असे राम सातपुते यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी मंदिरांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. त्यावर विचारले असताना सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंना भगवा दहशतवादी म्हटले होते आणि आता ते संत मंहतांना भेटत आहेत अशी टीका राम सातपुते यांनी शिंदे यांच्यावर केली आहे.