गीता जैन यांची पालिका अभियंत्याला मारहाण सुषमा अंधारे म्हणतात, ‘आम्ही करू तो कायदा, म्हणू ती पूर्व दिशा…’
यावरून जैन यांनी एखाद्या महिलेच्या भावना समजून घेताना तो अधिकारी हसला आणि हे सहन न झाल्यानेच आपण त्याला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : आमदार गीता जैन यांनी पालिका अभियंत्याला भर रस्त्यात मारहाण केली. त्यावरून आता राजकारण चांगलचं तापलेलं आहे. यावरून जैन यांनी एखाद्या महिलेच्या भावना समजून घेताना तो अधिकारी हसला आणि हे सहन न झाल्यानेच आपण त्याला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोलिस आमच्यावर दडशाही करतात, सेना भवनला शंभर दीडशे पोलिसांचा ताफा लावतात. मात्र दुसरीकडे त्यांच्याच आमदार गीता जैन या अभियंत्याला मारहाण करतात. त्यामुळं कायद्याची म्हणा किंवा लोकांची काहिच भीती त्यांना वाटत नाही. कायदा कसा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला जातो, लोकांना कसं वेटीस धरलं झालं जातो याचे उत्तम उदाहरण हे गीता जैन याचं समोर आहे. लोकप्रतिनिधींना वाटतं की शिंदे, फडणवीस आमच्या सोबत आहेत. आम्ही म्हणू तो कायदा. आम्ही म्हणू तो नियम, आम्ही करू ती पूर्व दिशा. मात्र या सगळ्या गोष्टी लोक बघतात आणि लोक त्यांना उत्तर देतील आणि लोकांच्या उत्तराला घाबरूनच ते निवडणुका लांबवत आहेत.