खासदार राणा यांच्यावर कुणी केली टीका, म्हणाल्या, ‘...पण नवनीत अक्का, हनुमान चालीसा पाठ असणं म्हणजे...’

खासदार राणा यांच्यावर कुणी केली टीका, म्हणाल्या, ‘…पण नवनीत अक्का, हनुमान चालीसा पाठ असणं म्हणजे…’

| Updated on: Aug 16, 2023 | 9:31 AM

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा चांगलाच समाचार घेतला. तर सोमय्या यांचा गेम त्यांच्याच लोकांनी केला. तर फडणवीस हे शब्द पाळत नाहीत.

अमरावती : 16 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमरावती दौऱ्यात जोरादार बॅटींग करताना भाजपवर निशाना साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा चांगलाच समाचार घेतला. तर सोमय्या यांचा गेम त्यांच्याच लोकांनी केला. तर फडणवीस हे शब्द पाळत नाहीत. तसेच अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असे त्या म्हणाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर देखील तोफ डागली. यावेळी अंधारे यांनी, त्यांच्या आणि राणा यांच्या वादावर बोलताना, आमच्यात काही वैर नाही असे म्हटलं. तर आम्हाला कुणाशी वाद वगैरे घालायचा नाही. पण नवनीत अक्का या हनुमान चालीसाच्या प्रेमात आहेत. तर हनुमान चालीसा असो किंवा कोणताही ग्रंथ, अभंग, श्लोक, कुराण आणि त्यातील आयात ही पाठ असणं म्हणजे खासदार नव्हे. किंवा असं असणं ही खासदारकिची पात्रता नाही असा खोचक टीका केली आहे.

Published on: Aug 16, 2023 09:31 AM