बडी भाभी म्हणजे देवयानी फरांदे ? ‘त्या’ पत्रावर बोलताना सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Dec 17, 2023 | 2:02 PM

ड्रग्ज आरोपी ललीत पाटील प्रकरणात काही दिवसांपूर्वी मला निनावी पत्र प्राप्त झाले होते. ते पत्र मी पुणे आयुक्तांना भेटून दिले. पत्रात जे संदर्भ दिलेत त्यात कुठलाही पुरावे जोडलेले नाही, या पत्रात छोटी भाभी ऊर्फ शेख या व्यक्तीला अटक झाली ही माहिती मी माध्यमांना दिली, सुषमा अंधारे त्या पत्रावर काय म्हणाल्या?

पुणे, १७ डिसेंबर २०२३ : ड्रग्ज आरोपी ललीत पाटील प्रकरणात काही दिवसांपूर्वी मला निनावी पत्र प्राप्त झाले होते. ते पत्र मी पुणे आयुक्तांना भेटून दिले. पत्रात जे संदर्भ दिलेत त्यात कुठलाही पुरावे जोडलेले नाही, या पत्रात छोटी भाभी ऊर्फ शेख या व्यक्तीला अटक झाली ही माहिती मी माध्यमांना दिली. तर बडी भाभी कोण आहे? असं विचारण्यात आलं पण मी काही माहिती दिली नाही. असे असतानाही देवयानी फरांदे यांनी चर्चेचा सूर स्वतःवर ओढून घेतला असे म्हणत सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर बडी भाभी म्हणजे मीच आहे आणि मलाच सुषमा अंधारे बोलल्या ते मला फार चमत्कारी वाटलं. तर बडी भाभी म्हणजे देवयानी फरांदे हे मला स्वप्नात माहिती नव्हतं असे म्हणत सुषमा अंधारे यांनी ज्या चुका मी केल्याच नाही त्याची मला भिती नाही म्हणत कारवाईला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

Published on: Dec 17, 2023 02:01 PM
देवेंद्र फडणवीस यांच्यावर अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल; स्पष्टच म्हणाले, मिठाचा खडा टाकण्यापेक्षा…
चंद्रपुरात ओबीसी बचाव परिषद, मनोज जरांगे पाटील यांचा होणार निषेध?