Sushma Andhare | ‘केतकीच्या मुद्यावर फडणवीस आक्रमक होणार नाहीत’: सुषमा अंधारे
अंधारे यांनी, महिला अजूनही असुरक्षित आहेत. त्यावर कोणीच काहीच बोलत नाहीत, असंही अंधारे यांनी म्हटलं आहे. तर केतकी चितळे असतील किंवा या सगळ्या तत्सम महिला असतील, त्यांच्यावर कधी टीकेची राळ उठत नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी महिलांनी कसे कपडे घालावेत यावरून राज्यातील दोन महिला नेत्या अमोरा-समोर आल्या आहेत. तर खरा वाद हा अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील असताना त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली. आणि या विषयावर उघड भाष्य केलं.
अंधारे यांनी, महिलांनी कोणते कपडे घालावेत, यासारख्या बाष्कळ विषयांवर चर्चा होते. पण गंभीर विषयांकडे लक्ष दिलं जात नाही असं म्हटलं आहे. तसेच ही चर्चा करतानाही विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांनाच टार्गेट केलं जातं, असा आरोप करताना अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
त्याचबरोबर अंधारे यांनी, महिला अजूनही असुरक्षित आहेत. त्यावर कोणीच काहीच बोलत नाहीत, असंही अंधारे यांनी म्हटलं आहे. तर केतकी चितळे असतील किंवा या सगळ्या तत्सम महिला असतील, त्यांच्यावर कधी टीकेची राळ उठत नाही. किंवा देवेंद्रजी कधी सभागृह बंद पडणार नाहीत.
तर कोणती व्यक्ती जर कोणत्या विचारधारेची असेल ते पाहून तुम्ही विरोध करणार असेल तर हे वाईट आहे. तसेच एखादी महिला मंत्री नाही जीच्याकडे आम्ही जाऊन बोलू असा चिमटा देखिल त्यांनी फडणवीसांचा काढला