‘भाजप-शिंदे गटात अजित पवार यांच्यामुळे धुसमुस?’, शिवसेना नेत्याचा दावा
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगिती झाल्याने सध्या राज्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढलेलं आहे. त्यावरूनच आता मनसे-ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर एकमेकांवर टीका करत आहेत. याचदरम्यान यावरूनच शिवसेना महिला नेत्याने सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांना स्थगिती देण्यात आलीये. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सरकारला जाब विचारलाय होता. तसेच या निवडणुका स्थगित करण्याचे कारण काय असा सवाल त्यांनी सरकारला केला होता. तर याचदरम्यान आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी थेट याचमुद्द्यावर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. सिनेटवरून अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले असतानाच शिवसेना ठाकरे गटाच्या फायर बँड नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप-शिंदे गटावर तोफ डागली आहे. अंधारे यांनी, भाजपच्या बदल्लची नकारात्मकता वाढलेली आहे. तर हे सर्व नेते सध्या सत्तासंघर्षात व्यस्त झाले आहेत. तर अजित पवार यांच्या सत्तेतील एन्ट्रीमुळे भाजप शिंदे गटात धुसमुस वाढलेली आहे. त्यामुळेत भाजप शिंदे गट कोणत्याच निवडणुकीला सामोरे जात नाही. मग ती कोणतीही निवडणूकी असो असी टीका केली आहे.