‘भाजपकडून फडणवीस यांचा करेक्ट कार्यक्रम सुरू’; अंधारे याचं मोठं वक्तव्य

‘भाजपकडून फडणवीस यांचा करेक्ट कार्यक्रम सुरू’; अंधारे याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jul 08, 2023 | 7:48 AM

त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावरून सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. याच पक्षप्रवेशावरून ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचेही बोलले जात आहे.

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘राम राम’ ठोकला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावरून सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. याच पक्षप्रवेशावरून ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचेही बोलले जात आहे. यावरूनच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी गोऱ्हे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. यावेळी त्यांनी आपल्याला मविआची चिंता नसून फडणवीस यांच्याबाबत चिंता आहे. तर भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 08, 2023 07:48 AM