अमृता फडणवीसांचे कपडे, उर्फी जावेदचा अधिकारच; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

अमृता फडणवीसांचे कपडे, उर्फी जावेदचा अधिकारच; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

| Updated on: Jan 11, 2023 | 7:44 AM

भाजप नेत्या चित्रा वाघ उर्फी जावेदच्या कपड्यांवरून आक्रमक झाल्या आहेत. त्यावर ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या सगळ्यावर भाष्य केलंय.

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) उर्फी जावेदच्या कपड्यांवरून आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्या या भूमिकेला काहींचा पाठिंबा मिळतोय तर काहीजण याला विरोध करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या सगळ्यावर भाष्य केलंय. “अमृता फडणवीस यांच्या कपड्यांवर माझा आक्षेप नाही. पण जसं अमृता फडणवीस यांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे, तो अधिकार उर्फी जावेदलाही (Urfi javed) आहे. चित्राताई तुम्हाला जर महिला आयोगाचं अध्यक्षपद हवं असेल तर सरकार तुमचंच आहे. त्यांना सांगा हवं तर न्यायालयात जा. पण त्यासाठी उर्फी जावेदच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका”, असं सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या आहेत.

Published on: Jan 11, 2023 07:43 AM