संजय शिरसाट यांच्या क्लिनचीटवर सुषमा अंधारे म्हणाल्या, “राज्याचे गृहमंत्री अभ्यासू…”
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं."औरंगाबादच्या एका आमदाराने सवंग थिल्लर भाषा केली होती . त्यांना मी महत्त्व देत नाही.
पुणे : शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं.”औरंगाबादच्या एका आमदाराने असभ्य भाषा केली होती . आमदाराने जी भाषा वापरली त्यामुळे स्त्री लज्जा उत्पन्न होते. तरी गुन्हा दाखल झाला नाही. आम्ही न्यायालयाकडेही दाद मागितली. शितल म्हात्रे प्रकरणात लगेच कारवाई होते, आमच्या प्रकरणात कारवाई का नाही? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. सुषमा अंधारे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले आहेत. “मला कुठलीच माहिती न देता, विचारपूस न करता हे प्रकरण निकाली काढलंय. देवेंद्र फडणवीस संवेदनशील व्यक्ती आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी कळत असतील. त्यांनी वकील म्हणून माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत”, असं अंधारे म्हणाल्या आहेत.
Published on: Jun 01, 2023 03:33 PM
Latest Videos