“किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ भाजपनेच व्हायरल केला”; सुषमा अंधारे यांचा आरोप, सांगितलं कारणही
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
पुणे, 19 जुलै 2023 | भाजप नेते किरीट सोमय्या यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांचे हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सोमय्या आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ भाजपने व्हायरल केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.त्या म्हणाल्या की, “चर्चा करावी असा हा व्हिडीओ नाही. प्रत्येक व्यक्तीबद्दल ते काय बोललं? त्यांनी का केलं याचा परिणाम होत असतो. आता अनेकांचे वस्त्रहरण करणाऱ्याचं वस्त्रहरण केलं आहे. किरीट सोमय्यांकडून 40 महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. ईडी, सीबीआय चौकशी लावण्याच्या धमकी देत…” सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या यासाठी पाहा हा व्हिडीओ…