विरोधक लपूनछपून आमच्या सभा पाहताहेत,  शिंदे-फडणवीस सरकारला संजय राऊत यांची भीती वाटते;  सुषमा अंधारे बरसल्या...

विरोधक लपूनछपून आमच्या सभा पाहताहेत, शिंदे-फडणवीस सरकारला संजय राऊत यांची भीती वाटते; सुषमा अंधारे बरसल्या…

| Updated on: Mar 05, 2023 | 12:17 PM

Sushma Andhare on Uddhav Thackeray Khed Sabha : संजय कदम यांचा आज आमच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश होतोय. पक्ष प्रमुखपदासाठी जी पात्रता आणि कुवत लागते त्याचा निर्णय जनता करेल, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

खेड, रत्नागिरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रत्नागिरीतील खेडमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेवर भाष्य केलंय.तसंच त्यांनी शिवसेना आणि भाजपवरही टीका केली आहे. या शिंदे-फडणवीस सरकारला संजय राऊत यांची भीती वाटते. आमच्या मागे सीबीआय, ईडी, सीडी किंवा काहीही लावलं तरी आम्ही घाबरणार नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. अब्दुलभाई सत्तार पक्ष तिथंच आहे. तर मग जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख कुठे आहेत, असा सवाल अंधारे यांनी केला आहे. विदर्भात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पुन्हा निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

Published on: Mar 05, 2023 12:14 PM