Sushma Andhare on Ashish Shelar : शेलार यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी वाटते, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची टीका
'आशिष शेलार, किरीट सोमैया ही मंडळी शकुनी मामाच्या भूमिका आलटून पालटून करत असतात, अशी टीका सुषमा अंधारेंनी केलीय. शिवसेनेनेही आता भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.
मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘आशिष शेलार यांच्या बुद्धिमत्तेची मला कीव करावी वाटते, असा घणाघात त्यांनी केला आहे. त्यासोबतच आशिष शेलार, किरीट सोमैया ही मंडळी शकुनी मामाच्या भूमिका आलटून पालटून करत असतात, असे देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. शिवसेनेनेही आता भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्याचं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टीकेवरुन दिसतंय. याचवेळी सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आत्ताच्या कलयुगात देवेंद्र रुपी कृष्णाने एकनाथरुपी कर्णाला युद्धातून बाहेर काढले, असं त्या म्हणाल्यात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काल भारतीय जनता पार्टीचा मेळावा पार पडला. यावरुन ही टीका करण्यात आली आहे.