Sushma Andhare on Devendra Fadnavis  : सत्ताप्रेमानं आंधळे झालेले कलियुगातील धृतराष्ट्र, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका

Sushma Andhare on Devendra Fadnavis : सत्ताप्रेमानं आंधळे झालेले कलियुगातील धृतराष्ट्र, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका

| Updated on: Aug 21, 2022 | 11:17 AM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काल भारतीय जनता पार्टीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी टीका केली होती. त्यावरूनच सुषमा अंधारे यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. वाचा...

मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर सत्ताप्रेमाने आंधळे झालेले कलियुगातील धृतराष्ट्र आहेत, अशी जहरी टीका अंधारे यांनी केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या पुण्यात बोलत होत्या. भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना देवेंद्र फडणवीस यांना श्रीकृष्णाची उपमा दिली होती. आत्ताच्या कलयुगात देवेंद्र रुपी कृष्णाने एकनाथरुपी कर्णाला युद्धातून बाहेर काढले, असं म्हणत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काल भारतीय जनता पार्टीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी टीका केली होती. त्यावरूनच सुषमा अंधारे यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे.

Published on: Aug 21, 2022 10:28 AM