Sushma Andhare : देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; सुषमा अंधारेंनी लिहिल मुख्यमंत्र्यांना पत्र
Sushma Andhare Letter : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता सुषमा अंधारे यांच्यावर सभागृहाच्या मानसन्मानावरून टीका केली आहे. त्यानंतर आज सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहीत समाचार घेतला आहे.
बात निकलेगी तो दूर तलक जायेगी, असं म्हणत उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. सभागृहाचा मानसन्मान मला खूप चांगला कळतो, असं म्हणत सभागृहाच्या मानसन्मानावरून केलेल्या टीकेला या पत्रातून अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
या पत्रात अंधारे यांनी म्हंटलं आहे की, नितेश राणे, चित्रा वाघ, संजय शिरसाट यासारख्या लोकांनी सारख्या लोकानी सभागृहाच पावित्र्य हरवून टाकलं आहे. याचं तुम्हाला जराही वैषम्य वाटत नाही. ही केवढी मोठी शोकांतिका म्हणावी? असा प्रश्न देखील या पत्रातून अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
Published on: Mar 25, 2025 11:21 PM
Latest Videos

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
