Video: अमरावतीत आढळली संशयास्पद बॅग, बॉम्बशोध पथक दाखल

| Updated on: Sep 11, 2022 | 1:10 PM

संशयास्पद बॅगेबाबत अधिक तपास करण्यासाठी पोलिसांसोबत श्वान पथक, बॉम्बशोधत पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

अमरावतीच्या पंचवटी परिसरात अनोळखी बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संशयास्पद बॅगची गंभीर दखल आता पोलिसांसह स्थानिक प्रशासनाने घेतली आहे. हा घातपाचा कट आहे की आणखी काही, या दृष्टीने अधिक तपास केला जातोय. संशयास्पद बॅगेबाबत अधिक तपास करण्यासाठी पोलिसांसोबत श्वान पथक, बॉम्बशोधत पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे याच परिसरात काही दिवसांआधी अशीच एक घटना समोर आली होती.

Published on: Sep 11, 2022 01:10 PM