नौटंकी करणाऱ्यांबरोबर आघाडी करण्यात रस नाही; राजू शेट्टी यांचा कोणावर निशाना
शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी वेळी पुन्हा एकदा आपण राज्यातील लोकसभेच्या 6 जागा आणि 42 मतदारसंघात समविचारी नेत्यांना सपोर्ट करू असे म्हटलं आहे
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याच्या आधीच आपण राज्यातील लोकसभेच्या 6 जागा निवडणूका लढवणार असल्याचे घोषित केले होते. त्यांनी ही घोषणा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाही रंगली होती. तर शेट्टी मविआबरोबर जाणार की भाजपला हात देणार यावरूनही राजकीय चर्चांना उधाण आले होते.
यावरून आता मात्र शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी वेळी पुन्हा एकदा आपण राज्यातील लोकसभेच्या 6 जागा आणि 42 मतदारसंघात समविचारी नेत्यांना सपोर्ट करू असे म्हटलं आहे. त्याचबरोबर आपल्याला मोठ्या आघाड्यांमध्ये फारसा रस नसल्याचे सांगत भाजप की महाविकास आघाडी ही कोंडी फोडत एकला चलो रे नारा दिला आहे. त्याचबरोबर समविचारी म्हणजे ज्यांना प्रामाणिकपणाची सिस्टीमच्या विरोधात भांडायचा आहे अशांना. तर जे फक्त नौटंकी करतात त्यांच्या बरोबर आपल्याला आघाडी करण्यात रस नसल्याचेही स्पष्ट केलं आहे.