‘स्वराज्य’राजकारणात येणार की नाही?, 2024 च्या निवडणुकीबाबत संभाजीराजेंचं महत्वाचं वक्तव्य
भाजीराजे छत्रपती यांनी 2024 च्या निवडणुकीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी या निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली आहे. पाहा...
नाशिक : जे चुकणार त्यांना स्वराज्य ठोकणार!, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. तसंच संभाजीराजे छत्रपती यांनी 2024 च्या निवडणुकीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. 2024 ला ‘स्वराज्य’ निवडणुकीच्या रिंगणात असेल. 2024 ला स्वराज्यचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. महाराष्ट्रातील लोकांच्या अपेक्षा आहेत की, स्वराज्य संघटनेने राजकारणात यावं. सामान्य माणूस राजकारणात यायला हवा. सामान्य माणूस आमदार, खासदार व्हायला हवा. त्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्हाला स्पेस द्यायचा की नाही, हे कुठलाही राजकीय पक्ष नव्हे तर जनता ठरवेल, असंही संभाजीराजे म्हणालेत.
Published on: Feb 12, 2023 12:27 PM
Latest Videos