केंद्र सरकार कोणाला घाबरतय; सावरकरवरून ठाकरे गटाच्या नेत्याचा भाजपला खोचक सवाल

केंद्र सरकार कोणाला घाबरतय; सावरकरवरून ठाकरे गटाच्या नेत्याचा भाजपला खोचक सवाल

| Updated on: Apr 02, 2023 | 11:03 AM

भाजपच्या नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत मविआतून बाहेर पडा असे आवाहन केले होते

छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून राज्यासह देशात मोठे वातावरण तापलेलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मी सावरकर नाही, गांधी माफी मागत नाही असे म्हणत भाजपला तापवलं होतं. त्यानंतर राज्यात मोठा गदारोळ झाला होता. भाजपच्या नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत मविआतून बाहेर पडा असे आवाहन केले होते. त्यावरून मनिया कायंदे यांनी भाजपला कोंडीत धरणारा सवाल केला आहे. त्यांनी बावनकुळे यांना उद्धव ठाकरे यांनी आधीच उत्तर दिलं आहे. पण भाजप गेली 8 वर्ष झाली सावरकर यांना भारत रत्न का देत नाही असा सवाल केला आहे. सावरकरांबद्दल त्यांना खरोखरच प्रेम असतं सावरकर यांना भारतरत्न घोषित करायला आठ वर्ष लागले नसते. ते अजूनही झालेलं नाही. केंद्र सरकार कोणाला घाबरतय? कसली भीती आहे? मग सावरकरांच्या विषयी फक्त हे सगळं दाखवण्यासाठी प्रेम आहे का? का केवळ मतपेट पेटीसाठी हे प्रेम आहे? असे प्रश्न विचारले आहेत.

Published on: Apr 02, 2023 11:03 AM