शिंदे हे नरेंद्र मोदींच्या विचारांचे वारसदार जास्त, राष्ट्रवादीची टीका
नरेंद्र मोदींवरून आज शिंदे सभागृहात असे संतापले, जसे ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कमी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारांचे वारसदार जास्त अशी टीका सुरत चव्हाण यांनी केली
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलच फैलावर घेतलं. विधानसभेत त्यांनी विरोधकांना धारेवर धरलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह बोलणं हा देखील देशाचा अपमान असल्याचं ते म्हणाले होते. यावरून एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदींच्या विचारांचे वारसदार जास्त वाटतात अशी टीका राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी केली आहे.
नरेंद्र मोदींवरून आज शिंदे सभागृहात असे संतापले, जसे ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कमी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारांचे वारसदार जास्त अशी टीका सुरत चव्हाण यांनी केली. तर शिंदे यांच्याकडून ही मोदी बद्दल जी कृतज्ञता व्यक्त केली आहे त्यावरून असा प्रश्न पडतो की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सुगावा होता का? भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा मार्ग सुकर व्हावा यासाठी केलेला प्रयत्न होता का? याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा.