घोड्यावरून संजय राऊत यांचा कोणाला टोला? म्हणाले, ताकद विसरला

घोड्यावरून संजय राऊत यांचा कोणाला टोला? म्हणाले, ताकद विसरला

| Updated on: Mar 29, 2023 | 11:45 AM

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. तर त्यांच्या ट्विटमुळे जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे.

मुंबई : सध्या राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राहुल गांधी यांच्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकमेकांच्या समोर आले आहेत. त्यातच सुषमा अंधारे आणि संजय शिरसाट यांचाही वाद विकोपाला जाताना दिसत आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. तर त्यांच्या ट्विटमुळे जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे.

राऊत यांनी, एका खुर्चीला घोडा बांधलेला फोटो ट्विट करत गुलामी की जब आदत… असं लिहलं आहे. ज्यामुळे यात घोडा कोण आणि ती खुर्ची कोण यावरून चर्चा रंगली आहे. राऊत यांनी आजच्या ट्विटमध्ये गुलामी की जब आदत पड जाती है, तो हर कोई अपनी ताकत को भूल जाता है… म्हणत अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे.

Published on: Mar 29, 2023 11:45 AM