संजय राऊत हा फुसका फटका; बावनकुळेंचा टोला
संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना, संजय राऊत हा फुसका फटका आहे. आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. मात्र उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडताना, लवकरच आपण दिल्लीत जाणार असून राहुल गांधींची भेट घेऊन याविषयी बोलणार असल्याचे सांगितलं. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. तसेच गेल्या अडीच वर्षात राहुल गांधींना किती वेळा भेटला. तेंव्हा का बोलला नाही.
संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना, संजय राऊत हा फुसका फटका आहे. आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. मात्र उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे. ते मुख्यमंत्री असताना 50 वेळा तरी काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला होता. त्यांना संजय राऊत भेटतच होते. रोज मांडीला मांडी लावून बसत होता ना? आता खोटार्डेपणा पुन्हा पुन्हा असे ते म्हणाले.
Published on: Mar 27, 2023 03:18 PM
Latest Videos