Sweta Mahale: श्वेता महाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; एसटी महामंडळातील प्रश्नासंदर्भात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

| Updated on: Aug 18, 2022 | 11:08 AM

एसटीचे अधिकारी शेखर चन्ने यांना बोलावून ऑर्डर काढून भरती करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती आमदार महाले यांनी दिली आहे.

भाजप आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज्यातील एसटी महामंडळातील 200 हुन अधिक प्रशिक्षणार्थी ऑर्डरच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशिक्षण पूर्ण करूनही ऑर्डर न निघाल्यानं श्वेता महाले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. एसटीचे अधिकारी शेखर चन्ने यांना बोलावून ऑर्डर काढून भरती करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती आमदार महाले यांनी दिली आहे. यामुळे ऑर्डरच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. रोजगारासंबंधी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून केली जात आहे.

Published on: Aug 18, 2022 11:08 AM