T. P. Munde : हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप, हरणाच्या शिकारीवर मुंडेंची प्रतिक्रिया
T.P. Munde On MLA Suresh Dhas : खोक्याच्या प्रकरणात मला अडकवून हत्येचा प्रयत्न होता, असा दावा आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर त्यावर टी. पी. मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या खुनाचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्यावर ओबीसी नेते टी. पी. मुंडे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे म्हणाले की, सगळ्या गावात चर्चा आहे, लोक म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे की सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. तो हरणाची तस्करी करत होता, शिकार करत होता आणि नंतर डब्ब्यात ते मांस भरून सुरेश धस यांना नेऊन देत होता, असा दावा टी. पी. मुंडे यांनी केला आहे.
खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझी हत्या करण्याचा कट होता, असा आरोप एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धस यांनी केला आहे. राजस्थान येथून बिश्नोई समाजाचे लोक मुंबईत आणणण्यात आले असल्याचं देखील धसांनी म्हंटलं आहे. हा आरोप करताना धस यांनी परळीकहा मुंडे असा देखील उल्लेख त्यात केला होता. त्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर त्यावर आता ओबीसी नेते टी. पी. पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. परळीमध्ये खूप मुंडे आहेत. धस यांनी माझं नाव घेऊन् हे आरोप केले तर त्याचं उत्तर मी देईल.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले

धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
