महाराष्ट्राला आता नकली नको, असली हिंदू पाहिजे!; भाजपच्या नेत्याची नाव न घेता ठाकरेंवर टीका

महाराष्ट्राला आता नकली नको, असली हिंदू पाहिजे!; भाजपच्या नेत्याची नाव न घेता ठाकरेंवर टीका

| Updated on: Mar 11, 2023 | 3:46 PM

जो हिंदुत्वासाठी काम करणार तोच महाराष्ट्रात राज्य करणार. आम्हाला नकली हिंदु नाही पाहिजे. आम्हाला ओरिजिनल मुख्यमंत्री पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचे दाखले देत टी राजा यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

अहमदनगर : शिवजयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा भाजपचे आमदार टी. राजा सिंग यांनी बोलताना इम्तियाज जलील यांच्यासह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. जो हिंदुत्वासाठी काम करणार तोच महाराष्ट्रात राज्य करणार. आम्हाला नकली हिंदु नाही पाहिजे. आम्हाला ओरिजिनल मुख्यमंत्री पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचे दाखले देत टी राजा यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “काही लोक औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलल्याने बेचैन झालेत. ही फक्त सुरुवात आहे. अहमदनगरचे नाव देखील बदलणार असून अहिल्यानगर होणार आहे. काही लोक म्हणतात आम्ही औरंगाबादबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार. पण तुझा जन्म औरंगाबादमध्ये झालाय आणि तू संभाजीनगरमध्ये मरणार. तुझ्या बापाचे बाप आले तरी आता नाव बदलू शकत नाही”, असं म्हणत टी. राजा सिंग यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे.

Published on: Mar 11, 2023 03:43 PM