मॅच नसताना वानखेडे खचाखच भरलं, टीम इंडियाच्या स्वागतासाठी तुफान गर्दी, बघा क्रिकेटप्रेमींचा उत्साह

| Updated on: Jul 04, 2024 | 5:11 PM

टीम इंडिया मुंबईत दाखल झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मुंबईत टीम इंडिया खेळाडूंची व्हिक्ट्री परेड निघणार आहे. आता मुंबईकर आणि क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या खेळाडूंची प्रतिक्षा आहे. यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट प्रेमींनी तुफान गर्दी करण्यास सुरूवात झाली आहे. गुजरातमधील डबलडेकर ओपन डेक बसमधून ही मिरवणूक काढण्यात येणार आहे

Follow us on

टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई पूर्णतः सज्ज झाली आहे. टीम इंडिया मुंबईत दाखल झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मुंबईत टीम इंडिया खेळाडूंची व्हिक्ट्री परेड निघणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे अशी टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढली जाणार आहे. याकरताच आता मुंबईकर आणि क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या खेळाडूंची प्रतिक्षा आहे. यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट प्रेमींनी तुफान गर्दी करण्यास सुरूवात झाली आहे. गुजरातमधील डबलडेकर ओपन डेक बसमधून ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी झालेली आहे. या मिरवणुकीची सांगता वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत खास सोहळा पार पडणार आहे. दरम्यान या टीम इंडिया खेळाडूंची व्हिक्ट्री परेडच्या वेळी मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर वाहतुकीतदेखील बदल करण्यात आला आहे. बघा कसा आहे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह?