जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन

जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन

| Updated on: Sep 28, 2023 | 4:12 PM

बाप्पाच्या विसर्जनादरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रत्येक विसर्जन स्थळावर तैनात करण्यात आलेत. तसेच, पोलीस प्रशासनाच्या वतीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

नागपूर : 28 सप्टेंबर 2023 | नागपूरमध्ये गणपती विसर्जन करताना कुठलीही दुर्घटना होऊ नये, म्हणून महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज झालाय. प्रत्येक विसर्जन स्थळांवर अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आलेत. शहरातील नैसर्गिक तलावात गणपती विसर्जनाला पालिकेने बंदी घातली आहे. त्यामुळे घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी शहरात ४१३ कृत्रिम टॅंक तयार करण्यात आलेत. ४ फुट किंवा त्यापेक्षा कमी आकाराच्या मूर्तींचे त्यात विसर्जन केले जाणार आहे. तर ४ फुटांपेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तीं विसर्जनासाठी कोराडी तलाव परिसरामध्ये मोठ्या आकाराचे कृत्रिम टँक निर्माण करण्यात आलेत. गणपती विसर्जन करताना कुठलीही जीवीच हानी होऊ नये, म्हणून अग्निशमन विभाग सज्ज आहे.

Published on: Sep 28, 2023 04:12 PM