Talathi Recruitment : तलाठी भरती परीक्षेचं वेळापत्रक आलं; ‘या’ तारखेपासून होणार परिक्षा सुरू; टीसीएस कंपनीकडून परीक्षा
त्यानंतर आता अनेक पदासांठी भरती प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी भरती जाहिर करण्यात आली होती. त्याला मध्यमंती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.
पुणे, 9 ऑगस्ट 2023 । गेल्या वर्ष भरापासून राज्यातील स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील भरतीची प्रतिक्षा करत होते. त्यानंतर आता अनेक पदासांठी भरती प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी भरती जाहिर करण्यात आली होती. त्याला मध्यमंती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता अखेर तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. तलाठी परीक्षा ही १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत घेतल्या जातील. तर या 4466 पदासाठी 11 लाख 10 हजार 53 उमेदवार त्यांचे नशिब आजमावणार आहेत. तर उमेदवारांना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशा तीन सत्रात होणार आहे.