Tanaji Sawant : सोज्वळ चेहरे करून आमचे आईबाप काढायचे, ही आमची राजकीय संस्कृती नाही, सावंतांची टीका

Tanaji Sawant : सोज्वळ चेहरे करून आमचे आईबाप काढायचे, ही आमची राजकीय संस्कृती नाही, सावंतांची टीका

| Updated on: Aug 03, 2022 | 9:57 AM

'सोज्वळ चेहरे करून आमचे आईबाप काढायचे, आमचे आई वडील विकले म्हणून सांगायचे आणि आमच्यावर हल्ला करायचे ही आमची राजकीय संस्कृती नाही,' असा हल्लाबोलही तानाजी सावंत त्यांनी केला.

पुणे: शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (uday samant) यांच्यावर काल रात्री हल्ला करण्यात आला. यावर आमदार तानाजी सावंतांवर (tanaji sawant) यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेला टोला लगावलाय. ते म्हणाले की, ‘आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सांगितलं की, एखाद्याने शिवीगाळ केली तर ती ओवी समजून गप्प बसा. आमचा संयम सुटला तर आमचे कार्यकर्तेही आक्रमक होतील. आमचे कार्यकर्तेही असं करू शकतात, असा इशारा देतानाच विनायक राऊतांनी सांगितलं ते शिवसैनिक नव्हते. मग उदय सामंत आणि तानाजी सावंत यांना मारण्यासाठी कुणी सुपारी दिली? तोच एफआयआर दाखल करण्याता आला आहे. काही लोकांनी विचारलं तुम्ही घाबरले का? उलट आम्ही 50 लोक अधिक एकत्र आलो. आम्ही 12-12 तास काम करत होतो, शिंदेसाठी आता 18-18 तास काम करू. आम्ही काय आहे हे आम्ही दाखवून देऊ. मला काही इजा झाली नाही. आईवडीलांच्या आशीर्वादाने बचावलो. पण ही काही लोकशाही नाही. सोज्वळ चेहरे करून आमचे आईबाप काढायचे, आमचे आई वडील विकले म्हणून सांगायचे आणि आमच्यावर हल्ला करायचे ही आमची राजकीय संस्कृती नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Published on: Aug 03, 2022 09:57 AM