पाळण्यातल्या बाळापासून ते आजोबापर्यंत, तानाजी सावंतांकडून मराठा कार्यकर्त्यांची माफी!

पाळण्यातल्या बाळापासून ते आजोबापर्यंत, तानाजी सावंतांकडून मराठा कार्यकर्त्यांची माफी!

| Updated on: Sep 26, 2022 | 12:35 PM

तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागितली आहे. पाहा काय म्हणालेत...

मुंबई : ज्या समाजामुळे मी आहे. ज्या समाजामुळे मी ताठ मानेने वावरतो. त्या समाजाची माफी मागायला मला कसलाही कमीपणा वाटत नाही. मी एकदा काय एक लाख वेळा मी माझ्या समाजाची माफी मागतो, असं तानाजी सावंत (Tanaji Sawant) म्हणाले आहेत. मी मराठा समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं ही माझी पहिली मागणी आहे. फक्त ते टिकणारं आरक्षण असावं, असं म्हणत तानाजी सावंत यांनी आपली मागणी सांगितली आहे.

Published on: Sep 26, 2022 12:35 PM