फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल? म्हणाले, ‘…तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं?
त्यावरून ठाकरे यांनी देखील पलटवार केला होता. त्यावर आता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांनी डिवचताना, 'उद्धव जी, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? असं म्हटलं आहे.
चंद्रपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर पाटण्यातील सभेवरून टीका करताना परिवारवाद मुद्दा उचलला होता. त्यावरून ठाकरे यांनी देखील पलटवार केला होता. त्यावर आता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांनी डिवचताना, ‘उद्धव जी, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? असं म्हटलं आहे. तर ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना, मी कोणाच्या मध्ये पडत नाही आणि पडलोच तर मग सोडत नाही असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मी काचेच्या घरात राहत नाही. तर जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर माझे जीवन हे खुले आहे, तुमच्याकडे जे काही आहे ते उघडपणे दाखवा असेही आव्हान केलं आहे. तर ज्यांच्या आलमरीत सांगाडे आहेत, त्यांनी सावकारीचा आव आणू नये, ते मग बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्ही ते बाहेर काढूच असेही त्यांनी म्हटलं आहे.