ej Pratap Yadav | तेजप्रताप यादव यांची प्रकृती बिघडली, काही दिवसांपूर्वीच घेतलीय रशियाची स्पुतनिक लस

ej Pratap Yadav | तेजप्रताप यादव यांची प्रकृती बिघडली, काही दिवसांपूर्वीच घेतलीय रशियाची स्पुतनिक लस

| Updated on: Jul 07, 2021 | 8:49 AM

तेजप्रताप यांची तब्येत बिघडल्यानंतरही त्यांच्यावर घरीच उपचार केले जातायत. काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीच तर अॅब्युलन्ससह सर्व बाबी तयार ठेवलेल्या आहेत.

लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav)यांची तब्येत अचानक
बिघडलीय. तेजप्रताप यांनी ताप आलाय आणि श्वास घ्यायलाही त्रास होतोय. तेजप्रताप यांनी अलिकडेच रशियन
बनावटीची स्पुतिनक लस घेतलेली आहे. त्यानंतर ते आजारी पडलेत. त्यांचे लहान भाऊ तेजस्वी यादव हे तातडीनं
तेजप्रताप यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचलेत. डॉक्टरांची एक टीम तेजप्रताप यांच्यावर घरीच उपचार करतीय.

तेजप्रताप यांची तब्येत बिघडल्यानंतरही त्यांच्यावर घरीच उपचार केले जातायत. काही आणीबाणीची परिस्थिती
निर्माण झालीच तर अॅब्युलन्ससह सर्व बाबी तयार ठेवलेल्या आहेत. पण सध्या तरी तेजप्रताप यांच्या तब्येतीला
कुठलाही धोका नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. भाऊ तेजस्वी यादव मोठ्या भावाच्या सोबतच आहेत.