VIDEO | मोठी बातमी! काँग्रेसमधून हकालपट्टी होताच आशिष देशमुख यांना मुख्यमंत्री यांची साथ? थेट ऑफर?
आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. तेच देशमुख यांच्या अंगलट आल्याचे बोलले जात आहे.
नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली आहे. शिस्तपालन समितीने याबाबत आदेश दिले होते. तर आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. तेच देशमुख यांच्या अंगलट आल्याचे बोलले जात आहे. यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांची आशिष देशमुख यांनी भेट घेतल्याचे कळत आहे. तसेच त्यांना राव यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली असून महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पद किंवा राज्यसभा देण्याची ऑफर दिल्याचे कळत आहे. याबाबत देशमुख यांनी दुजोरा देताना, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी बोलावलं होतं. त्यांच्यासोबत हैदराबादमध्ये दिवसभर चर्चा केली. माझ्या निलंबणाची त्यांना माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी मला बोलावलं होतं. मात्र यावर अजून काही विचार केलेला नाही. वडिलांचा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पुढची दिशा ठरविणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.