Video : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज नांदेड दौऱ्यावर, सभाही घेणार

Video : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज नांदेड दौऱ्यावर, सभाही घेणार

| Updated on: Mar 26, 2023 | 9:48 AM

Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज नांदेडमध्ये येणार आहेत. त्यांची आज नांदेड जिल्ह्यातील लोहा इथे सभा होतेय. पाहा व्हीडिओ...

नांदेड : बीएसआर पक्षाचे नेते तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांची आज नांदेड जिल्ह्यातील लोहा इथे सभा होतेय. दुपारी तीन वाजता लोहा शहरातील बैल बाजार मैदानात सभा होणार आहे. या सभेत अनेकजण करणार बीएसआर पक्षात प्रवेश करणार आहेत. शतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे, आदिवासी नेते नागनाथ घिसेवाड, दलित नेते सुरेश दादा गायकवाड आणि वंचित आघाडीचे यशपाल भिंगे बीएसआर पक्षात प्रवेश करणार आहेत. या नेत्यांसह त्यांचे समर्थकही पक्षप्रवेश करणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील अन्य काही जण देखील प्रवेश करणार आहेत.

Published on: Mar 26, 2023 09:47 AM