”हिजाबला समर्थन अन् ड्रेस कोड विरोध करणाऱ्यांची वेगळी जमात उघडी पडली” भाजपचा विरोधकांवर हल्लाबोल
पुण्यातील वाघाली येथील वाघेश्वर मंदिर, नागपूरच्या धंतोलीच्या गोपालकृष्ण मंदिर, बेलोरी सावनेरच्या पंचमुखी मारूती मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तर काही मंदिरात हे नियम लागू करण्यात येणार आहेत.
मुंबई : राज्यातील अनेक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. यावरून सध्या जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. अनेक राजकारण्यांना यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पण आता तोकडे कपडे घातल्यास या मंदिरात नो एन्ट्री असणार आहे. याच्या आधीच पुण्यातील वाघाली येथील वाघेश्वर मंदिर, नागपूरच्या धंतोलीच्या गोपालकृष्ण मंदिर, बेलोरी सावनेरच्या पंचमुखी मारूती मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तर काही मंदिरात हे नियम लागू करण्यात येणार आहेत. यावरून टीका करणाऱ्यांवर भाजपचे आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे. त्यांनी, मंदिर ही आपली संस्कार आणि संस्कृतीची केंद्र आहेत. तिथे तयार होणाऱ्या नियमांचं स्वागत केलं पाहिजे आणि तंतोतंत पालन केले पाहिजे. मात्र या निमित्ताने एक वेगळी जमात आपल्या समोर येते आहे. जी हिजाबचं समर्थन करते आणि दुसरीकडे मंदिरात ड्रेस कोड विरोध करत आहेत. तर हिजाबवर बंदी आणली तर धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात येत आणि मंदिरात ड्रेस कोड लागू केला तर वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात येत. अशी दुटप्पी माणसं समाजात उघडी पडली आहेत असा घणाघात केला आहे.