राज्यात मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता? या ”चार” मंदिरांमध्ये फक्त भारतीय संस्कृतीचे….
याचदरम्यान तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात महिलांनी असभ्य कपडे घालून येऊन नये, असा फतवा काढण्यात आला होता. पण राज्यातील नागरिकांनी मंदिर समितीच्या या निर्णयाला प्रचंड विरोध केल्यानंतर मात्र हा निर्णय मागे घेण्यात आला.
मुंबई : काही दिवसांपासून राज्यातील मंदिरातील वादाचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. अनेक ठिकाणी धार्मिक वादामुळे तर काही ठिकाणी तोकडे कपड्यांमुळे वाद झाल्याचे दिसत आहेत. याचदरम्यान तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात महिलांनी असभ्य कपडे घालून येऊन नये, असा फतवा काढण्यात आला होता. पण राज्यातील नागरिकांनी मंदिर समितीच्या या निर्णयाला प्रचंड विरोध केल्यानंतर मात्र हा निर्णय मागे घेण्यात आला. पण आता नागपूर येथील चार मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालून येण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतल्याची माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांच्याकडून देण्यात आली आहे. तर नागपूरनंतर महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी व्यापक अभियान राबवून भाविकांमध्ये वस्रसंहितेविषयी जागृती करण्यात येणार असल्याची माहिती घनवट यांनी यावेळी दिली.